पंढरीचे अभंग, विठ्ठलाची उराउरी भेट, तुकाराम आणि मी… (उत्तरार्ध)
तुकोबा हसत म्हणाले, ‘‘हे विठ्ठल नावाचे पंढरीचे भूत हे सर्व भुतांमध्ये फार मोठे आहे. एकदा का याची आस लागली, एकदा का याने झपाटले - तर या जगात परत येताच येत नाही. मोक्षापर्यंत जावेच लागते. आई, बाप, लग्नाचा नवरा, लग्नाची बायको, मुले, मुली कोणी आपले नाही, हे आपल्या लक्षात येते. फक्त विठ्ठल हा एकच सोयरा म्हणून राहतो.’ तुकोबा एक क्षणभर थांबले आणि एकदम म्हणाले – ‘‘असे होणे चालणार आहे का तुला?’’.......